सध्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने जागांची मागणी करत आहे, त्याला महाविकास आघाडीतीलच नेते प्रतिवाद करत आहेत. असाच वाद सध्या उबाठा गटाचे संजय राऊत आणि काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यात सुरु आहे. संजय राऊतांनी उबाठा गट लोकसभेत २३ जागा लढवेल, असे म्हटल्यावर संजय निरुपम यांनी मग काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर राऊतांनी आम्ही काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी बोलतो, असे खोचकपणे म्हटले. त्यावर आता संजय निरुपम यांनी उबाठा गट स्वबळावर एकही जागा जिंकू शकत नाही, असे म्हणत चांगलेच सुनावले.
काय म्हणाले होते संजय निरुपम?
शिवसेनेचा ठाकरे गट स्वबळावर लोकसभेची एकही जागा निवडून आणू शकत नाही. त्यांनी मागील निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकल्या होत्या, त्यापैकी बहुतांश खासदार पळून गेले आहेत. आता त्यांच्याकडे ४-५ खासदार उरले आहेत. ते ही त्यांच्याकडे राहतील की नाही याची गॅरंटी नाही. दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. सद्यस्थितीत ठाकरे गटाला काँग्रेसची व काँग्रेसला ठाकरे गटाची गरज आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्यावर दोघांनीही संयम राखण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत यांची स्मरणशक्ती क्षीण झाल्याचाही दावा केला. मला कोण ओळखते हे संजय राऊत यांच्यापेक्षा चांगले कुणालाही माहिती नाही. काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे आमच्या नेत्यांनाही ठावूक नसते. त्यामुळे बाहेरच्या नेत्यांना काय माहिती असणार? राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले, तर मी निश्चितच जाईल. पण निमंत्रण मिळाले नाही, तर मी 22 जानेवारीनंतर जाऊन रामाचे दर्शन घेईल, असे संजय निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले.
Join Our WhatsApp Community