मुंबई पालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मुंबईतील आणखी एक नगरसेवक ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत दाखल झाला.
मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५६ च्या माजी नगरसेविका अश्विनी अशोक माटेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह उपविभाग प्रमुख अशोक परशुराम माटेकर, शाखा प्रमुख नितीन शंकर चव्हाण यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला.
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार – मुख्यमंत्री)
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच चांदीवली विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रश्न नक्की तडीस लावू असे सांगून यावेळी आशवस्त केले. यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाट, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर हेदेखील उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community