आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप; सांगितला CM शब्दाचा नवा अर्थ

164

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव येथे सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करप्ट सीएम म्हणत टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्यावरुन सत्ताधारी शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेतील रस्त्याच्या घोटाळ्यावरुन एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबईकरांना लुटण्याचा प्रयत्न

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी ज्या दिवशी प्रवेशासाठी लोक आपल्याकडे येतील त्यादिवशी आमच्या कामाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईकरांना लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नावरुनही शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. आमचे हिंदुत्व, तुमच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा: संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र; 500 कोटींच्या घोटाळ्याचा केला आरोप, काय आहे प्रकरण? )

सीएमचा नवा अर्थ

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईचे पाच मंत्री होते. त्यामुळे मुंबईसाठी जे करता येईल त्यासाठी कोणतीही तडजोड आम्ही केली नाही. मात्र, आताच्या मंत्रिमंडळात एकाही महिलांना स्थान नाही, एकही मुंबईचा मंत्री नाही. त्यामुळे मुंबईसाठी कसे काम करणार, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. सीएम म्हणजे करप्ट माणूस असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.