ठाकरे गटाचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. लांडगे यांच्या अटकेसाठी शिंदे गट पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. विनोबा भावे पोलीस स्थानकाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
( हेही वाचा: 2030 पर्यंत 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावणार; गडकरींनी सांगितला प्लॅन )
नेमके प्रकरण काय?
वर्षभरापूर्वी किरण लांडगे यांनी पाणी प्रश्नी एल वाॅर्डवर मोर्चा नेला होता. या मोर्चादरम्यान आक्रमक शिवसैनिकांनी पालिकेच्या कर्मचा-यांना धक्काबुक्की केली होती. यासंदर्भात पोलिसांनी किरण लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या सर्व प्रकारानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली, त्यानंतर न्यायालयाने लांडगे यांचा जामीन अर्ज रद्द केला आणि त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community