ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विधीमंडळाला चोरमंडळ असे संबोधल्याने सत्ताधा-यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यातच आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राऊतांनी आता निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली आहे.
संजय राऊत यांनी सध्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु केली आहे. आधी विधीमंडळाला चोरमंडळ असे संबोधले आता निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली आहे. सांगलीतील एका सभेत ते बोलत होते.
( हेही वाचा: देशात आता सरकार बदलण्याचा मूड; शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल )
काय म्हणाले संजय राऊत?
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला बहाल केले. त्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत, निवडणूक आयोग बरखास्त करा, असे विधान केले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या या निर्णायावर भाष्य करताना संजय राऊत यांनी शिवीगाळ केली. निवडणूक आयोग म्हणतं की शिवसेना शिंदे गटाची, शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का? असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली.
Join Our WhatsApp Community