बाप पळवणारे आता मुलंही पळवायला लागले; भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशावरुन राऊतांचे टीकास्त्र

124

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आता याच मुद्द्यावर खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र डागले आहे. मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलेही पळवायला लागले, असे ते म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे चिंरजीव शिवसेनेत नव्हते. सोमवारी सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे. पण मिंधे गट बाप पळवतात आता ते मुलेही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरु आहे, ती कुचकामी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

( हेही वाचा: दापोली साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची उच्च न्यायालयात धाव )

भाजपच्या वाॅशिंगची कमाल

उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर काही आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वाॅशिंगमशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसवले आहे. ही भाजपच्या वाॅशिंगमशीनची कमाल आहे. मग उदय सामंत यांच्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्नही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.