कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात हक्क सागंण्यास सुरुवात केली म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटत भवन उभे करायचे म्हणत आहात. मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल, तर तुम्हाला सुद्धा बेळगाव आणि बंगळुरूमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा पलटवार ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौ-यावर असून त्यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना, कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशीसुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते. गुवाहाटीवरुन येताना महाराष्ट्रामध्ये आसाम भवन बांधण्याचे ठरवले. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये. त्यामुळे कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हालासुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बंगळुरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येतील, त्या संदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करु असे संजय राऊत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सुनावले.
( हेही वाचा: तिने तिचा ‘तो’ हट्ट सोडला नाही; शेवटी …” लोकलमध्ये चढलेल्या महिलेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल )
….तर तुमची अस्मिता थंड पडते
गेल्या काही दिवसांपासून शिवरायांचा अपमान करण्याची महाराष्ट्रात लाट आली आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. भाजपकडून सर्सासपणे शिवरायांचा अपमान करण्याचे सत्र सुरु आहे. भाजप हे शिवप्रेमाचे ढोंग करत आहेत. मोदी यांना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होत आहे. मग महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्यावर तुमची अस्मिता थंड का पडते, तिथे तुमचा नाग फणा काढत नाही. काही चुकीचे असेल तर मला सांगा? असा उलटप्रश्न राऊतांनी केला.