राज्यातील सरकार लवकर घालवले नाहीतर राज्याचे पाच तुकडे होणार; राऊतांची सरकारवर जोरदार टीका

महाराष्ट्रात सध्या अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद निर्माण होत असल्याचे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावे तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यांपासून महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवले नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक गप्प राहणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.

राऊतांचा शिंदे सरकारला टोला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झाले, असा टोलाही राऊतांनी शिंदे सरकारला लगावला. हे सरकार राज्यात आल्यामुळे, आपण महाराष्ट्राचे लचके तोडू असे अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.

( हेही वाचा: काँग्रेस २७ वर्षांपूर्वीच विसर्जित झाली, महात्मा गांधींचे स्वप्न साकारले, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? )

मुख्यमंत्री ‘या’ गोष्टींवर गप्प का?

राऊत पुढे म्हणाले की, राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यापाल चुकीची वक्तव्य करत आहेत. भाजपचे प्रवक्तेदेखील चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत. उपमुख्यमंत्री त्याचे समर्थन करत आहेत. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे. यावर संजय राऊतांना प्रसारमाध्यामांनी विचारले असता, त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here