..तर सरकारने विरोधकांना भाषणाचीही स्क्रीप्ट लिहून द्यावी; राऊतांचा हल्लाबोल

160

महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या मोर्चाला पोलिसांनी घातलेल्या अटींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणा-यांविरोधात मोर्चा काढला जात असताना आमच्यावरच अटी लादल्या जात आहेत. भाषणात अमुक शब्द वापरु नये, असे बंधन घालण्यात आले आहे. या अटींपेक्षा या सरकारनेच आम्हाला भाषण लिहून द्यायचे होते, असा संताप यांनी व्यक्त केला. शनिवारी होणार मोर्चा हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन देणारा असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा: महाविकास आघाडीच्या ‘विराट’ मोर्चाला भाजपाचा काऊंटर अ‍ॅटॅक )

महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अॅंड क्रू़डास कंपनी ते टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारीतपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला जाण्यापूर्वी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली आहे.

….तर सरकारने मोर्चात सहभागी व्हावे

संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारमधील काही मंत्र्यांमध्ये महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल, तर त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे त्यांनी म्हटले. सत्तेत असणा-या लोकांमधील महाराष्ट्रप्रेमी हे खोक्याच्या वजनाखाली दबले गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.