ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा चोरमंडळ असा उल्लेख केला आणि राज्याचे राजकारण ढवळून निघाले. त्यांच्यावर चौफेर टीका सुरु झाल्या. शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी राऊतांना या वक्तव्यावरुन घेरले. त्यातच आता कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना, संजय राऊतांवर आरोप केला आहे.
( हेही वाचा: किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा; 7 लाखांचा अपहार )
याचे परिणाम राऊतांना भोगावे लागणार- सत्तार
हे सगळे साम्राज्य उद्ध्वस्त झाले त्याचे मूळ कारण संजय राऊत आहेत. त्यांनी राजकीय समीकरणे कुठे जोडायची? कसे जोडायचे? काय बोलायचे? कुठे बोलायचे? कसे बोलायचे? बोलण्याचे परिणाम काय? याची जाणीव न ठेवता ते बोलतात. हे चुकीचे आहे. राज्यात विधानसभा- परिषदेचा सन्मान करायला हवा, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
संजय राऊत हे आमच्या मतांमुळेच राज्यसभेचे खासदार झाले. आमच्या मतांमुळेच त्यांना राज्यसभेत काम करण्याची संधी मिळाली. अशा माणसाने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांना वाटते आहे की आपण राज्यसभेवर आहोत म्हणून दुस-याला काहीही बोलू शकतो. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
Join Our WhatsApp Community