ठाकरे आणि शिंदे गटातील वाद हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आता ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधील शाब्दिक बाचाबाची समोर आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा अधिकारी गद्दारांना नसल्याचं ठाकरे गटाच्या वतीनं सांगितलं होत. याला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाच्या नेत्यानं थोबाड फोडण्याची भाषा केली आहे. आता ठाकरे गटाच्या नेत्यानं दम असेल तर फोडून दाखवा, असं आव्हान केलं आहे.
नक्की काय घडलं?
मंगळवारी हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांचं तैलचित्र विधीमंडळात लावण्यात आलं. यावरून ठाकरे गटाच्या वतीनं बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचा अधिकार गद्दारांना नाही, असं सांगण्यात आलं होत. याला उत्तर देताना शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले की, ‘जे कोणी असं बोलतात, त्यांचं थोबाड फोडलं पाहिजे.’
शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आव्हान केलं. एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना ते म्हणाले की, ‘दम असेल तर फोडून दाखवं. मी म्हणतो आता गद्दार. पुन्हा एकदा म्हणतो, गद्दार. गद्दारांना अधिकार नाही. दम असेल तर फोडून दाखवं.’
(हेही वाचा – पालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी; आशिष शेलारांची सडकून टीका)
Join Our WhatsApp Community