अनिल परबांच्या अडचणीत वाढ; साई रिसाॅर्ट प्रकरणी दापोलीत गुन्हा दाखल

129

दापोली येथील साई रिसाॅर्ट प्रकरणी ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 420 अन्वये दापोली पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

दापोली येथील रिसाॅर्ट हे अनिल परब यांच्या मालकीचे असून परब यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून बांधकाम केले असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्याशिवाय, हे रिसाॅर्ट खरेदी करण्यासाठी गैरमार्गाने कमावलेला पैसा वापरला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर सोमय्यांनी या रिसाॅर्टचे पाडकाम करण्यासाठी प्रशासनाकडे तगादा लावला होता. या रिसाॅर्टचे पाडकाम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. त्याआधीच अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात 4 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून पाच लाख रुपये मदतीची घोषणा )

भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल

रुपा दिघे यांनी दापोली पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना अॅ़ड. अनिल परब, सुरेश तुपे आणि अनंत कोळी यांच्याविरोधात भादंवि 34 आणि 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानुसार एकहून अधिक व्यक्तींनी एकत्र येत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आदी आरोप परब आणि इतरांविरोधात करण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.