शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेऊन पत्र दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देताना विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर सुनावणी घ्यावी असे सुनील प्रभूंनी म्हटले आहे.
सोमवारी नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि अध्यक्षांचे पत्र त्यांच्याकडे देण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत नसल्याने ७९ पानांचे निवेदन झिरवळ यांच्याकडे देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीनुसार लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही केल्याचे सुनील प्रभू म्हणाले. यावेळी आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू, अनिल परब, सचिन अहीर, सुनील राऊत, मनिषा कायंदे आदी उपस्थित होते.
नक्की सुनील प्रभू काय म्हणाले?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना सुनील प्रभू म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयानेच लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. तशीच मागणी आम्ही केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाहेरील एकही मनाचा शब्द आम्ही निवेदनात लिहिलेला नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आमच्या निवेदनाबाबत विचार करतील. पण जर विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घेतला नाही तर काय करायचे, हे पुढे पाहू.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community