ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील नेत्यांवर आधी ईडीची कारवाई करून अटकेची भीती दाखवली, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत प्रयोग सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गुरुवारी, १३ एप्रिलला माध्यमांसोबत बोलताना केला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंबंधित केलेल्या विधानालाही दुजोरा दिला.
नक्की काय म्हणाले राऊत?
शिवसेनेतून निघून गेलेल्या आमदार आणि खासदारांपैकी निम्म्या लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू होत्या. ते घाबरुनच गेले आहेत. आता तोच प्रयोग राष्ट्रवादीबरोबर सुरू आहे आणि हे सगळ्यांना माहित आहे, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच राऊत पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी जे काही सांगितले, ते सत्य आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर येऊन मला तुरुंगात जायचे नाही, मला अटकेची भीती वाटते सांगितले होते. त्यांनी अशाप्रकारची चर्चा याच माझ्या मैत्री बंगल्यावर येऊन माझ्याशीही केली होती. तेव्हा आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की, आपण या प्रसंगाला सामोरे जावे. आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा आहोत. माझ्यावरही असा प्रसंग येईल, मलाही अटक करतील अशी भीती आहे, असे मी त्यांना सांगितले होते.
(हेही वाचा – भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी)
Join Our WhatsApp Community