विधिमंडळाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव बुधवारी १ मार्चला दाखल केला होता. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावून ४८ तासांत लेखी म्हणणे मांडण्यासंदर्भात सांगितले होते. पण अद्यापही संजय राऊतांना हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून त्यांच्यावर पुढील कारवाई काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
१ मार्चला संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांसोबत बोलताना विधिमंडळाला चोरमंडळ असं म्हटलं होत. आणि त्यानंतर याचे पडसाद विधिमंडळात पाहायला मिळाले. विधानसभा आणि विधानपरिषद, अशा दोन्ही सभागृहात राऊतांविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्याची मागणी करण्यात आली आणि याच दिवशी दोन्ही सभागृहाचं दिवसभराचं कामकाज स्थगित करण्यात आलं होत. शिवाय याच दिवशी म्हणजेच बुधवारीच राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावली आली होती.
या हक्कभंगाच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी राऊतांकडे ४८ तास होते. शुक्रवारी संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत राऊतांना उत्तर द्यायचं होत. या नोटीसद्वारे राऊतांना लेखी खुलासा करण्यासंदर्भात कळविण्यात आलं होतं. तसंच उत्तर देण्याबाबत कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. असं असूनही राऊतांनी अद्याप हक्कभंगाच्या नोटीसाला उत्तर दिलेलं नाही.
(हेही वाचा – आम्ही रक्त देणारे ढेकूण आहोत, रक्त पिणारे ढेकूण नाही; उद्धव ठाकरेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर)
Join Our WhatsApp Community