तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा – संजय राऊत

138

विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे. माहितीनुसार बुधवारी, १ मार्चला हक्कभंगाची नोटीस राऊतांना दिली आहे. त्यामुळे या नोटीशीला राऊतांना शुक्रवार संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे. पण हक्कभंगाची नोटीस माझ्या हातात पडली नसल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. तसेच तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा, असंही राऊत म्हणाले.

‘माझ्या हातात नोटीस असती तर मी उत्तर देऊ शकलो असतो’

कोल्हापुरात प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘माझ्या हातात चौकशीची नोटीस आली नाही. जेव्हा मी कार्यालयात जाईन किंवा घरी जाईन, तेव्हा ती नोटीस पाहिन. माझ्या हातात नोटीस असती तर मी उत्तर देऊ शकलो असतो. इतक्या घाईघाईने कायदेशीबाबींना उत्तर देता येत नाही. कायद्याचं राज्य असल्यामुळे कायद्याचा अभ्यास नीट केला पाहिजे.’

शिंदेंच्या शिवसेनेवर राऊतांनी साधला निशाणा

पण या राज्यात सध्या सगळं काही बेकायदेशीर असल्यामुळे सरकार घटनाबाह्य असल्यानं त्यांची प्रत्येक कृती बेकायदेशीर असणारच. त्यांच्या कायद्याचा अभ्यास कच्चा आहे, त्यांना कायदाच माहित नाही, बेकायदेशीरपणे सत्तेवर बसलेली लोकं आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधी पक्षांना दशद्रोही म्हटलं होत ना. नंतर त्यांनी सारवासारव केली. मी ही तेच म्हणतोय. विधिमंडळाचा अपमान होईल, आमदारांचा अपमान होईल असं काहीही विधान मी केलेलं नाही. एक विशिष्ट गट बेकायदेशीरपणे शिवसेना आमची आहे म्हणून सांगतोय त्यांना मी चोरमंडळ म्हटलंय. त्यांनी पक्षाची चोरी करणं, धनुष्यबाणाची चोरी करणं आणि पुन्हा आम्हीच शिवसेना आहे म्हणून सांगणं, हे बेकायदेशीर आहे. आणि हे विधान मी बाहेर केलं आहे, त्याच्यामुळे हा हक्कभंग होतो की नाही हे पाहावं लागलं. आणि अशा लोकांना अख्खा महाराष्ट्र आणि चोर म्हणतोय, असं म्हणतं राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला

(हेही वाचा – भाजपच्या ‘या’ आमदाराचा मुलगा 40 लाखांची लाच घेताना अटकेत)

हक्कभंग नोटीला गुरुवारी उत्तर देण्याबाबत राऊत म्हणाले, ‘मला काय फासावर लटकवणार आहेत का? तर लटकवा. काही हरकत नाही, तेवढंच शिल्लक आहे आता. तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.