राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी शनिवारी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली. गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली असून यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी तब्बल साडेनऊ तास ईडीच्या पथकाने मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेतली. त्यानंतर ईडीने मुक्षीफांना चौकशीसाठी समन्स बजावून येत्या सोमवारी, १३ मार्चला ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्वीट करून राष्ट्रीय तपास यंत्रणा, भाजपवर टीका केली आहे.
संजय राऊत ट्वीटरवर मुश्रीफांचा फोटो पोस्ट करून म्हणाले की, मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ईडीची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ईडी येथे गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजीकडे पाठवीत आहे.
मुश्रीफ यांच्यासेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे.महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत
आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे.ed येथे गप्प का?
उद्या एका भ्रष्ट कारखान्याचे प्रकरण देवेंद्रजी कडे पाठवीत आहे pic.twitter.com/SUVJZgCwC9— Sanjay Raut (@rautsanjay61) March 12, 2023
दरम्यान आता हसन मुश्रीफ सोमवारी ईडी चौकशीला सामोरे जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यापूर्वीही हसन मुश्रीफांना समन्स बजावला होता, मात्र ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.
(हेही वाचा – शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दोघांना अटक)
Join Our WhatsApp Community