अनिल परब – किरीट सोमय्या वाद पेटला; म्हाडा कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

thackeray group protest outside mhada office
अनिल परब - किरीट सोमय्या वाद पेटला; म्हाडा कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या

माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनी परिसरातील इमारतीत असलेले अनधिकृत कार्यालय पाडण्यात आले आहे. या कारवाईनंतर अनिल परब यांनी पाडण्यात आलेल्या ठिकाणाहून पत्रकार परिषद घेतल्यापासून राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. तसेच यामुळे आता अनिल परब आणि किरीट सोमय्यांमधील वाद पेटला आहे. ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून म्हाडा कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

माहितीनुसार, काही संतप्त शिवसैनिक म्हाडाच्या बीकेसीतील कार्यालयात घुसले होते. अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हे शिवसैनिक घुसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आता म्हाडाच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. किरीट सोमय्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

(हेही वाचा – आता लक्ष साई रिसोर्ट आणि अस्लम शेख यांच्या स्टुडिओकडे; परबांच्या कार्यालयावर हातोड पडल्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया)

संपूर्ण घटना

दरम्यान अनिल परब वांद्रे यांचे येथील म्हाडा कॉलनी परिसरातील इमारत क्र. ५७ आणि ५८ मध्ये जनसंपर्क कार्यालय होते. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी म्हाडाकडे केली होती. हे कार्यालय अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंगळवारी, ३१ जानेवारीला म्हाडातर्फे कार्यालय पाडण्यात येणार होते. पण त्यापूर्वी परब यांनी स्वतःहूनच अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली होती. आता जवळपास परब यांचे सर्व कार्यालय पाडण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here