महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरण हे गंभीर आहे. त्याच बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक होण्याची भीती वाटत होती का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कधी काळी ते भाषण करायचे की आम्ही वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजतो. मग त्यांना अटकेची भीती का? अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासारख्या नेत्यांवर खोटे आरोप लावले जातात. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. तेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडत नाहीत का? असा सवालही राऊत यांनी यावेळी केला. राऊत सध्या नाशिक दौ-यावर आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
( हेही वाचा: मुंबई उपनगरला मिळाले नवे जिल्हाधिकारी, निधी चौधरी यांची बदली )
तुमच्या पक्षातील लोकांना मात्र क्लिन चिट
मला अटक होणार होती, हा देवेंद्र फडणवीस यांचा नुसता कांगावा आहे. अटक झाल्यानंतर त्यांना प्रकाशात यायचे होते. पण त्या वेळेचे मुख्यमंत्री सभ्य, सुसंस्कृत होते, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे. आमच्यावर खोटे खटले दाखल केले आहेत. धाडी घालत आहेत. तेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडत नाहीत का? तुम्ही तुमच्या राजकीय सहका-यांना त्रास देता आणि तुमच्या पक्षातील लोकांना क्लिन चिट देता. आमचे फोन टॅप करणा-यांवरचे गुन्हे तुम्ही मागे घेता. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे का? असा सवालही राऊत यांनी केला.
Join Our WhatsApp Community