उद्धव ठाकरेंनी रविवारी मालेगावमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन सभा घेतली. ठाकरेंच्या सभेदरम्यान दुसरीकडे मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट घेतली. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी वीर सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही मी राहुल गांधींशी या विषयावर चर्चा करेन असे राऊतांनी नमूद केले, ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
( हेही वाचा : दीड वर्षाच्या मुलाला ४ दिवसात दिले ४ इंजेक्शन, गॅंगरीनमुळे बाळाचा मृत्यू! जळगावात डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल )
वीर सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट
महाराष्ट्रात वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मी या विषयावर दिल्लीत जाऊन राहुल गांधींशी चर्चा करणार आहे असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच उद्धव ठाकरेंनीही मालेगावच्या सभेत आमची वीर सावरकरांविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे असेही राऊतांनी स्पष्ट केले.
सदू आणि मधू भेटले असतील
संजय राऊत म्हणाले, सदू आणि मधू भेटले असतील, मालेगावतील उद्धव ठाकरेंची विराट सभा पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील ते एकमेकांनी पुसले असतील. आम्ही त्या भेटीवर काय बोलणार? असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना भेटीवरून टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ते जुने मित्र असतील किंवा त्यांना नव्याने प्रेम उफाळून आले असेल आम्ही काय करणार? आम्ही आमचं काम करतोय असे राऊतांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community