काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झाली. या बैठकीला तिन्ही घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थितीत होते. एकत्रितरित्या झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत रणनीती आखण्यात आल्याची चर्चा झाली, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. पण यावरून ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराज असल्याचे दिसून आले आहे. बैठकीत एक आणि बाहेर एक असे म्हटले जात आहे.
(हेही वाचा – Sadabhau Khot : सदाभाऊंना पुन्हा ‘आमदार’ झाल्यासारखं वाटतंय?; आमदारकी गेल्यानंतरही विधानपरिषदेच्या लेटरहेडचा वापर)
दरम्यान १४ मे रोजी महाविकास आघाडीची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणजेच नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या. या मुलाखतीमध्ये पटोले आणि पाटलांनी केलेल्या दाव्यांमुळे ठाकरे गटाच्या गोट्यात नाराजी पसरली आहे. मविआच्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यावर बोलले गेले, त्यापेक्षा वेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते माध्यमांसोबत बाहेर बोलत आहेत, असा थेट आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. बैठकीत झालेल्या चर्चेपेक्षा मुलाखतीमध्ये वेगळ्या मुद्द्यावर बोललण्यामुळे मविआत संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे ठाकरे गटाकडून म्हटले जात आहे.
नेमकी कोणी नाराजी व्यक्त केली?
नाना पटोले आणि जयंत पाटलांच्या मुलाखतीवरून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भास्कर जाधव म्हणाले की, ‘मविआच्या बैठकीत एका गोष्टीवर चर्चा होते, बैठकीत एक ठरते आणि त्यानंतर मुलाखतीत नेत्यांकडून वेगळे बोलले जात आहे. यामुळे मविआतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community