महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना (ठाकरे गट) देखील समान नागरी कायद्याला पाठिंबा देऊ शकते, अशी चर्चा राजधानीत सुरु आहे. विरोधी गोटातील आम आदमी पक्षाने आधीच पाठिंबा दिला आहे. तथापि, औपचारिकपणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कायद्यावर कोणतेच अधिकृत विधान केले नाही. मात्र, विधेयक संसदेत आणल्यास त्याला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पाठिंबा असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. सरकार पावसाळी अधिवेशनात समान नागरी संहिता विधेयक आणण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Ashish Shelar : भाजपचा नियोजित मोर्चा रद्द : “आज आम्ही काही बोलणार नाही पण…” – आशिष शेलार)
सूत्रांनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका व त्यापूर्वी अनेक राज्यांतील निवडणुका पाहता मोदी सरकार हे विधेयक संसदेत मांडू शकते. उत्तराखंड राज्यासाठी समान नागरी कायदा (यूसीसी) तयार करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यासाठी समिती स्थापन केली आहे. लवकरच मसुदा सरकारला देणार असल्याचे न्यायमूर्ती देसाई यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community