उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमध्ये कारवाई करून अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. त्याला मलबार हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोट केले.
विधिमंडळाबाहेर प्रसार माध्यमांसोबत बोलत असताना आदित्य ठाकरे यांना अनिल जयसिंघानीला अटक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. अनिल जयसिंघानीचा शिवसेनेत प्रवेश झाला होता, असे विचारले असताना त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘ठीक आहे, पण त्यांना आणले कोणी होते? हे तुम्हाला माहितेय. आता ज्या जिल्ह्यातून ते येतात, त्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख कोण होते? पालकमंत्री कोण होते? यामध्ये मला जायचे नाही. कारण याच्यात खरं सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात एवढे जाऊ शकतात, हे गंभीर आहे.’
त्यानंतर आदित्य ठाकरे यांना मोहित कंबोज यांच्या ट्वीटबाबत विचारण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचे.’
(हेही वाचा – अनिल जयसिंघानीनंतर संजय पांडे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा काऊंटडाऊन सुरू; मोहित कंबोज यांचे ट्वीट)
Join Our WhatsApp Community