महाराष्ट्र विधान परिषदेत लोकायुक्त विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. हे विधेयक मंजूर केल्यानंतर अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, मागील अधिवेशनात प्रलंबित राहिलेलं लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे समाजसेवक अण्णा हजारे यांची राज्य सरकारचे आभार मानून ते पुढे म्हणाले की, ठाकरे सरकारने केवळ आश्वासन दिलं,पण कायदा केला नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
ठाकरे सरकारला लोकायुक्त कायदा नको होता. देवेंद्र फडणवीस यांनी वेळ लावला, पण कायदा केला, असेही अण्णा हजारे यावेळी म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community