Uday Samant : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला तो राज्यातील जनतेच्या पचनी पडला म्हणून शिवसेनेला (Shivsena) घवघवीत यश मिळाले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्पष्ट केले होते की, काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी शिवसेना बंद करेन. परंतु आता सगळंच उलट सुरु असून काँग्रेसच्या तालावर ठाकरेंचा नाच सुरू आहे, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटप केला. त्याप्रमाणे सौगात-ए-मोदी (Saugat-e-Modi) हा उपक्रम राबवण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे ते म्हणाले. (Uday Samant)
उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवार २७ मार्चला पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची दोस्ती पक्की आहे. उद्धव ठाकरे बालिशपणा करत आहेत, शिवसेना खरी कोणाची? हे न्यायालयाने आधीच सिद्ध केले आहे. आम्ही ८० जागा लढलो ६० जागा जिंकलो, ते फक्त २९ जागाच जिंकले, त्यांच्या हातात आता काही राहिले नाही. काँग्रेसच्या (Congress) तालावर ते सध्या नाचत आहेत, असा हल्लाबोल सामंत यांनी केला. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर जाऊन बाळासाहेब यांच्यासोबत गद्दारी केल्याची टीका केली.
(हेही वाचा – विधानसभेच्या अंदाज समिती आणि आश्वासन समितीवर आमदार Kiran Samant यांची निवड)
दरम्यान,
सौगात – ए – मोदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उपक्रम आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेक नरेटीव्ह सेट केला आहे. तसेच आम्ही पाकिस्तानचे समर्थन करत नाही, यांनी कंगनाच्या घरावर कारवाईसाठी बुलडोझर पाठवला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवले. यांनी जे कृत्य केले ते पुसले जाणार नाहीत, असे सामंत यांनी सांगत ठाकरेंवर आरोपांची सरबत्ती केली.
दरम्यान,