UBT Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईकरांची चिंता की वरळीची

वरळीतील समस्यांचा उल्लेख करण्यात आला तरी या विधानसभेचे आमदार असलेले आदित्य ठाकरे हे मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले.

111
Shiv Sena UBT ला पडू लागली केंद्रातील सत्तेची स्वप्ने!

मुंबईतील विविध नागरी समस्यांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेना आमदारांसमवेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांची मंगळवारी महापालिका मुख्यालयात भेट घेतली. या भेटीमध्ये विरोधी पक्ष नेते यांनी मुंबईतील ज्या नागरी समस्या बाबत आयुक्तांना आयुक्तांना निवेदन सादर केले. त्यामध्ये बहुतांशी समस्या तथा मुद्द्यांच्या समावेश हा वरळी विभागांतील होता. या शिष्टमंडळामध्ये मुंबईतील शिवसेनेचे अनेक आमदार आणि माजी नगरसेवक हे सहभागी झालेले असताना त्यांच्या प्रभागातील समस्यांचा उल्लेख न करता दानवे यांनी वरळी मधील समस्यांचा उल्लेख केल्यामुळे त्यांना मुंबईची चिंता आहे की वरळी विधानसभेची असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र वरळीतील समस्यांचा उल्लेख करण्यात आला तरी या विधानसभेचे आमदार असलेले आदित्य ठाकरे हे मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना पुढे करण्याची वेळ आली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. (UBT Shiv Sena)

विधान परिषदेचे परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दानवे यांनी मंगळवारी आयुक्तांना मुंबईतील विविध नागरी समस्या बाबतचे निवेदन देत ११ प्रमुख मुद्द्यांच्या तथा समस्यांच्या उहापोह केला. या ११ मुद्द्यांमध्ये वरळी विधानसभेतील तीन प्रमुख मुद्द्यांचा समावेश असून या तीन मुद्द्यांमध्ये वरती आठ नागरिकांचा समावेश आहे. दानवे यांच्यासह आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य तसेच माजी नगरसेवक यांनी स्वाक्षरी केलेल्या या निवेदनामध्ये गावकरी, ईस्टेट, वरळीगाव येथील अत्यंत जीर्ण झालेले इलेक्ट्रिक सबस्टेशन दुरूस्त करावी, अशी मागणी केली आहे. त्याबरोबरच वरळी कोळीवाडा येथील पर्जन्य वाहिनी, मलनिस:रण वाहिनी, नवीन सिमेंटचे रस्ते, पूर्व पश्चिम समुद्र किनारा तसेच जनता कॉलनी येथील स्वच्छता व समुद्र किनाऱ्यांचे सुशोभिकरण करणे, याबरोबरच वरळी कोळीवाडा ते प्रभादेवी येथील समुद्रकिनाऱ्यांचे सुशोभिकरण करणे आदी कामाचा उल्लेख करत प्रशासनाला ही कामे तातडीने करण्याची मागणी केली आहे. यापैकी इलेक्ट्रिक सबस्टेशन दुरूस्त करणे हा विषय बेस्ट उपक्रम यांच्या अखत्यारीत येत असून तोही विषय आयुक्तांच्या निवेदनात रेटला आहे. (UBT Shiv Sena)

(हेही वाचा – Caste Census : त्यांना हिंदू एकत्र येण्याची भीती; आशिष शेलार यांची टीका)

वरळी विधान सभेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहे, तर याच वरळीतील दोन आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. म्हणजे वरळीत तीन आमदार असताना वरळीतील अनेक विकास कामे करण्यात तसेच समस्यांचे निवारण करण्यात तिन्ही आमदार अपयशी ठरत असल्याचे या मागण्यांवरून स्पष्ट दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या शिष्टमंडळाच्या निवेदनात एकूण ११ समस्यांचे विवरण देण्यात आले. त्यात केईएम, नायर, शीव, कुपर या चार प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालय आणि आरोग्य व्यवस्थेबाबत प्रारंभीचे तीन मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तर चौथा मुद्दा हा विरोधी पक्ष नेत्यांना महापालिकेत कार्यालय देण्याबाबतचा आहे. तर उर्वरित मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व ड्रेनेज लाईनची सुधारणा, उद्यानाचे सुशोभिकरण, मैदान दुरूस्ती, पाणी पुरवठा इत्यादी कामे करणे… तसेच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि अनुदानित शिक्षकांचे विविध प्रश्न आदी उपस्थित करण्यात आले आहे. या समस्या नागरीकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत असून त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता वर नमूद समस्यांबाबत आपण व्यक्तीशः लक्ष घालून सोडविण्याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने हाती घेऊन त्याबाबत उचित निर्णय घ्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे. (UBT Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.