साई रिसाॅर्ट जमीनदोस्त होणार? सोमय्या राहणार उपस्थित

98

दापोलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दापोलीतील वादाच्या भोव-यात सापडलेल्या साई रिसाॅर्टवर हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित रिसाॅर्ट हे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता, पण अनिल परबांनी ते आरोप फेटाळले होते.

साई रिसाॅर्ट हे समुद्र किना-याजवळच उभारण्यात आले आहे. हे रिसाॅर्ट उभारले तेव्हा केंद्रीय पर्यावरण विभागाने आखून दिलेल्या नियमांचे पालन झाले नाही, असा आरोप करण्यात आला होता. संबंधित रिसाॅर्ट हे अनधिकृत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. अखेर आता या प्रकरणी प्रशासन या रिसाॅर्टवर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. यावेळी किरीट सोमय्या देखील उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याच्या बांधकाम विभागाने रिसाॅर्ट पाडण्याबाबतची जाहीरात स्थानिक वृत्तपत्राला दिली होती. तीन महिन्यात रिसाॅर्टचे पाडकाम केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.

( हेही वाचा: गुजरात निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना सुट्टी )

साई रिसाॅर्टवर हातोडा?

चिपळूणच्या बांधकाम विभागाकडून स्थानिक वर्तमानपत्र दैनिक तरुण भारतमध्ये टेंडर जाहिरात देण्यात आली होती. साई रिसाॅर्ट पाडण्यासाठीची ही जाहिरात असून कंत्राटदारांना 10 नोव्हेंबरपर्यंत टेंडर भरण्याचे आवाहन या जाहिरातीतून करण्यात आले होते. दापोली येथील साई रिसाॅर्ट एनएक्सचे बांधकाम, पोचरस्ता, कंपाऊंड वाॅल, इमारतीच्या भिंती पायापर्यंत पाडायच्या आहेत. तसेच, रिसाॅर्ट पाडल्यानंतर उरलेला सिमेंट आणि मातीचा ढिगारा उचलून त्याची विल्हेवाट लावायची आहे. त्यानंतर रिसाॅर्ट पाडलेल्या जागेचे सपाटीकरण करायचे आहे, असे या टेंडरमध्ये कामाचे स्वरुप देण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.