Thane Borivali Tunnel : ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त १२ मिनिटांतच! ‘असा’ असेल जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

243
Thane Borivali Tunnel : ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त १२ मिनिटांतच! 'असा' असेल जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग
Thane Borivali Tunnel : ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त १२ मिनिटांतच! 'असा' असेल जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात देशातील सर्वात लांब आणि मोठा भुयारी मार्ग (Thane Borivali Tunnel) बांधला जात आहे. मुंबईच्या नॅशनल पार्कच्या (forest of the National Park) जंगलातून हा भुयारी मार्ग जात आहे. या भुयारी मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास आता फक्त 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे.

(हेही वाचा-Mumbai Alert: मुंबईत हायअलर्ट! मोठ्या दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलिसांकडून ‘मॉक ड्रिल’)

या मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने (MMRDA) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) कडून कर्ज घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गाची पायाभरणी करण्यात आली. (Thane Borivali Tunnel)

या बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवासात 1 तासांची बचत होणार आहे. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा हा 16 हजार 600 कोटींचा प्रकल्प आहे. त्यामुळे थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ठाणे ते बोरिवली या दुहेरी भुयारी मार्गामुळे घोडबंदर रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होणार आहे. (Thane Borivali Tunnel)

(हेही वाचा-Edible Oil Prices : सणासुदीच्या दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत होणार वाढ?)

प्रकल्पाची एकूण लांबी 11.8 किमी आहे, त्यापैकी 10.25 किमीचा बोगदा आहे. दोन्ही बोगद्यांमध्ये दोन मार्गिका आणि एक आपत्कालीन मार्गिका असणार आहे. त्यामुळे ठाणे ते बोरिवली प्रवास विनाथांबा आणि सिग्नलरहित होणार आहे. 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. (Thane Borivali Tunnel)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.