शासकीय अधिकाऱ्यांची बोटे छाटायची, असा प्रकार याआधी कधीच घडला नव्हता. इतक्या दिवसात कुणाची हिम्मत झाली नव्हती. जेव्हा बोटे छाटणारा बाहेर पडेल, त्यावेळी भीती काय असते हे दाखवून देऊ, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
सोमवारी ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला केला आणि त्यांची बोटे छाटली. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
‘त्या’ फेरीवाल्यांची सगळी बोटे छाटली पाहिजे!
फेरीवाल्यांची मस्ती उतरवली पाहिजे. त्यांची जेव्हा सगळी बोटे छाटली जातील आणि त्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा त्यांना समजेल. नुसता निषेध करून हे फेरीवाले सुधारणार नाही. त्यांची हिंमत ठेचली पाहिजे, असे सांगत राज ठाकरे म्हणाले कि, महाराष्ट्रात अधिकाऱ्यांची बोटे छाटतातच कशी? आज पकडले, उद्या बाहेर येतील पुन्हा बोटे छाटायला. ज्या दिवशी पोलिसांच्या हातून बाहेर पडतील, त्या दिवशी आमच्याकडून मार खातील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
बोटे छाटायची हिंमतचा कशी झाली?
फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात, तर मग सरकार कशासाठी आहे? हे काय फक्त मुंबईत होते का, इतक्या वर्षात कधी फेरीवाल्यांची शासकीय अधिकाऱ्यांची बोटे छाटायची हिम्मत झाली नाही. हे फेरीवाले जेव्हा पोलिसांच्या हातून सुटतील तेव्हा त्यांना भीती काय असते हे दाखवून देऊ, असे राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community