केतकी चितळेला जामीन तरीही मुक्काम तुरूंगातच!

131

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत सापडली होती. या प्रकरणात केतकीला ठाणे न्यायालयाने अॅस्ट्रॉसिटी कायद्यांतर्गत जामीन मंजूर केला आहे. केतकीला २५ हजार रूपयांच्या जामीनावर सध्या जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने दिलासा दिला आहे. असे असले तरी केतकीचा मुक्काम मात्र तुरूंगातच राहणार आहे. कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे, ज्या प्रकरणावर २१ जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे.

(हेही वाचा – केतकीच्या मदतीला केंद्रीय महिला आयोग, पोलीस महासंचालकांना नोटीस)

शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यानंतर केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली. पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलने झाली. यासह तिच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता केतकी चितळेने आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाची दारं ठोठावली आहेत.

(हेही वाचा – केतकीला झालेला ‘एपिलेप्सी’ आजार नेमका आहे तरी काय?)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.