ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना एका फेसबुक पोस्टवरून शिंदेंच्या शिवसेनेतील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. तसेच या घटनेचा सध्या सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रोशनी शिंदेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पण तत्पूर्वी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि ठाण्याच्या माजी महापौरी मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन रोशनी शिंदेना मारहाण झालीच नाही, असा मोठा खुलासा केला आहे.
मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, ‘ज्यावेळी एखाद्याला मारहाण होते, त्यावेळी एमएनसी रिपोर्टवरती गुन्हा नोंद होतो की, कुठल्याप्रकारचा गुन्हा लावला गेला पाहिजे. सिव्हिल सर्जननी जो रिपोर्ट दिला आहे, त्यावर कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे दिसत आहे. तसेच ती गर्भवतीही नाहीये. त्यामुळे त्यांनी देखील रोशनी शिंदे यांना लगेच घरी जायला सांगितले होते. पण खासदारांनी जबरदस्तीने रोशनी शिंदे यांना संपदा रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे मला असे वाटते की, घरच रुग्णालयात असल्यामुळे आयसीयूमध्येच काय कुठेही तिला दाखल करतील. सलाईन लावून झोपवतील. त्यामुळे सहानभुती मिळवण्यासाठी अशाप्रकारे रोशनी शिंदे यांनी ढोंग केले आहे.’
पुढे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, ‘हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्यासाठी कट रचला जात होता. ठाण्यातील खासदार एका महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. इतकचे नव्हे तर, तुमच्यात पुरषार्थ उरला असेल तर स्वत: रस्त्यावर उतरा,’ असे आव्हान यावेळी त्यांनी केले.
(हेही वाचा – Agitation Against Arvind Sawant: अरविंद सावंतांविरोधात ठाण्यात रिक्षावाल्यांचे आंदोलन)
Join Our WhatsApp Community