काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली काढणार; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांची ग्वाही

71
मुंबई प्रतिनिधी:
Eknath Shinde : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांतील पाणीटंचाई (water shortage) दूर करण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करत आहे. काळू धरण पूर्ण (Kalu Dam) होईपर्यंत पर्यायी उपायांचा अवलंब केला जाईल आणि धरण पूर्ण झाल्यानंतर ठाणे शहराची पाणीटंचाई कायमस्वरूपी निकाली काढली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. (Eknath Shinde)
ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईच्या समस्येवर आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाणीपुरवठ्याच्या सुधारित योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
ठाण्यातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उपाययोजना
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. सध्या ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मिळून मुंब्रा, कौसा आणि कळवा भागात रोज १३०.५० दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा करत आहेत. पूर्ण क्षमतेने आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सहा नवीन जलकुंभ (वॉटर टँक) उभारले जात आहेत. यातील दोन जलकुंभ आधीच कार्यान्वित झाले असून उर्वरित चार जलकुंभांसाठी जलवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘रिमोल्डिंग प्रकल्प’ राबविला जात आहे. यासाठी सरकारने ‘नगरोत्थान’ योजनेतून २४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

(हेही वाचा – MMRDA : झोपडपट्टी वासियांसाठी बनविण्यात आलेल्या संकलन शिबिरात बेकायदेशीर कब्जा )

काळू धरण आणि अतिरिक्त पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव
ठाणे महापालिकेने कळवा, मुंब्रा आणि दिवा भागासाठी ५० MLD आणि संपूर्ण ठाणे शहरासाठी १०० MLD पाण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश एमआयडीसीला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, एमआयडीसीच्या बारवी धरणातून ठाणे शहराला ५० MLD अतिरिक्त पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, विटावा भागात एमआयडीसी रात्री १२ ते सकाळी ५ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवते. त्यामुळे येथील नागरिकांना होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी या कालावधीतही पाणीपुरवठा सुरू ठेवण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
अवैध नळ जोडण्यांवर कारवाईचा इशारा
ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर काही ठिकाणी अवैधरित्या नळ जोडण्यांचे प्रमाण आढळल्यास तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत आमदार रईस शेख आणि दिलीप लांडे (MLA Dilip Lande) यांनीही सहभाग घेतला.

(हेही वाचा – The Tariff War : नवीन अमेरिकन शुल्कवाढीतून भारताची होणार सुटका?)

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय लवकरच
ठाणे शहरातील पाणीटंचाईसाठी (Thane city water shortage) तात्पुरत्या उपाययोजना करत असतानाच काळू धरण हे अंतिम आणि दीर्घकालीन उपाय म्हणून लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. त्यामुळे ठाणेकरांच्या पाणी समस्येचा कायमस्वरूपी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.