हिरेन मृत्यू प्रकरणात आता नवीन माहिती… ‘तो’ अधिकारी माफीचा साक्षीदार होणार!

मनसुख हिरेन यांच्या अचानक मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबल माजली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई दहशतवादी विरोधी पथका(एनआयए)कडून केला जात होता. पण आता ठाणे सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवून एनआयएकडे सोपवण्याचे आदेश एटीएसला दिले. त्याप्रमाणे एटीएसकडून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची सर्व सूत्रे एनआयएकडे सोपवण्यात आली असून, एनआयएने आता तपासाला सुरुवात केली आहे. तसेच सचिन वाझे यांचे सहकारी रियाझुद्दीन काझी हे माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाल्याची माहिती एनआयएने दिली आहे.

सचिन वाझेंविरोधात गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणात आरोपांच्या वादळात सापडलेले सचिन वाझे यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाझेंचे सहकारी असलेले रियाझुद्दीन काझी माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाल्याची माहिती एनआयएकडून न्यायालयात देण्यात आली आहे. रियाझुद्दीन काझी यांच्यासह दोन पोलिस अधिका-यांनी या प्रकरणात सचिन वाझे यांना मदत केल्याचा संशय एनआयएला आहे.

तपास वर्ग करण्याचे दिले आदेश

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)तर्फे करण्यात येत होता. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएसमार्फत केला जात होता. पण आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवून तपासाची कागदपत्रे एनआयएकडे द्यावीत, असे ठाणे सत्र न्यायालयाने एटीएसला आदेश दिले. तपासाची सर्व कागदपत्रे विनाविलंब एनआयएकडे सोपवा, असे ठाण्यातील मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एनआयएला दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सुद्धा काय धागेदोरे एनआयएला मिळणार, हे बघणे आता महत्त्वाचे असणार आहे.

(हेही वाचाः परमबीर सिंग आता जाणार उच्च न्यायालयात! सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…)

म्हणून एनआयएची न्यायालयात धाव

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचे आदेश एटीएसला दिले होते. पण एटीएसकडून तपासाची कागदपत्रे एनआयएकडे न सोपवता या प्रकरणाचा तपास चालू ठेवला. त्यामुळे यासाठी एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here