ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात तुफान राडा

147

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा राडा झाला. ठाण्याच्या किसन नगरमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. सगळ्यात आधी भट वाडीत हाणामारी झाली. नतंर ठाण्यातील श्रीनगर पोलीस स्टेशनबाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राजन विचारे यांच्यावर शिंदे गटातील काही जणांना पाण्याची बाटली फेकून मारली असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान, जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

( हेही वाचा: पुण्यात PMPML चालक आणि दुचाकीस्वारामध्ये तुंबळ हाणामारी; पहा व्हिडीओ )

मिळालेल्या माहितीनुसार, आज किसान नगर भागात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. ठाण्यातील हा भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील भान मानला जातो. हा भाग शिंदे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण येथूनच त्यांना सर्वाधिक मतदान होते. याच ठिकाणी ठाकरे गटाने सोमवारी मेळावा घेतला. येथील ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी हा मेळावा आयोजित केला होता. त्याठिकाणी अचानक शिंदे गटाचे काही माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्त आले. यानंतर दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला. यानंतर माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते आले. यानंतर दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला. यानंतर या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यावेळी ही हाणामारी होत होती, त्यावेळी राजन विचारेही घटनास्थळी उपस्थित होते. यासोबतच या ठिकाणी केदार दिघे देखील उपस्थित होते. तसेच, शिंदे गटाकडून माजी नगरसेवक योगेश जानकरदेखील उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.