Thane Smart City : ठाणे शहराला स्मार्ट करण्यासाठी १० हजार ७९२ झाडांची कत्तल; सरकारची विधानसभेत कबुली

149
Thane Smart City : ठाणे शहराला स्मार्ट करण्यासाठी १० हजार ७९२ झाडांची कत्तल; सरकारची विधानसभेत कबुली

ठाणे शहराला स्मार्ट (Thane Smart City) करण्यासाठी तब्बल १० हजार ७९२ झाडे तोडल्याची कबुली राज्य सरकारने मंगळवारी (१८ जुलै) विधानसभेत दिली. यापैकी ४७७ झाडे धोकादायक ठरल्यामुळे, तर विकासकामात बाधा येत असल्यामुळे १० हजार ३१५ झाडे तोडण्यात आली आहेत.

ठाणे शहरात स्मार्ट सिटी (Thane Smart City) योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्ते आणि फुटपाथची कामे सुरू आहेत. ही कामे करीत असताना जवळपास ७ लाख झाडांची कत्तल करण्यात आल्याचा दावा आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केला. त्यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री उदय सामंत म्हणाले, ठाणे शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एकूण २१ रस्त्यांवरील २३.४० किमी लांबीच्या पदपथाचे काम ऑक्टोबर २०२२ पूर्वी करण्यात आले.

(हेही वाचा – मंत्रालयातील एका सहीमुळे रखडला वांद्रे पश्चिम रेक्लमेशनचा विकास – आशिष शेलार)

मात्र ही कामे करताना ७ लाख झाडे तोडल्याचा दावा चुकीचा आहे. ठाणे महापालिका (Thane Smart City) क्षेत्रात ४७७ धोकादायक झाडे तोडण्यात आली, तर विकासकामात बाधा ठरणारी १० हजार ३१५ झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच २५ हजार ७३४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने कळवली आहे, असे सामंत सभागृहात सांगितले.

ऑडिट झाले नाही

२५ हजार ७३४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आल्याची माहिती प्रभारी मंत्री सामंत यांनी दिली. मात्र, त्यावर सुनील प्रभू आणि वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेतला. पुनर्रोपण केलेली किती झाडे जगली, याचे आकडे सरकारकडे आहे का, ऑडिट झाले आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर पुनर्रोपित केलेली ८० टक्के झाडे जगल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र, त्याचे ऑडिट झाले नसल्याची कबुली त्यांनी दिले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.