हर हर महादेव सिनेमावरुन केलेल्या राड्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि आव्हाडांना एक रात्र पोलिस कोठडीत घालवावी लागली. यामुळे राष्ट्रवादा काँग्रेसने तीवर् आंदोलन करत सरकारवर निशाणा साधला.
पण आव्हाडांच्या अटकेत मोलाची भूमिका बजावणारे झोन-5 चे उपायुक्त विनयकुमार राठोड यांची शनिवारी वाहतूक शाखेत बदली करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राठोडांना मिळालेले हे बक्षिस असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तक नगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर उपायुक्त राठोड हे त्याठिकाणी आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिस ठाण्याला घेराव घातला. वैद्यकीय चाचणीसाठी आव्हाड यांना घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला. यावेळी पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज देखील करण्यात आला.
आव्हाडांचा आरोप
त्यानंतर आव्हाड यांना शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यावर विनयकुमार राठोड यांची वाहतूक विभागाच्या उपायुक्त पदी बदली करण्यात आली. त्यामुळे आपल्यावर केलेल्या कारवाईचे बक्षिस राठोड यांना मिळाले असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे, तर इतरही 10 उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे ही सामान्य बदली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
10 उपायुक्तांच्या बदल्या
राठोड यांना झोन-5 च्या उपायुक्त पदी 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच वाहतूक विभागाचे उपायुक्त पद हे गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. त्यामुळे त्या पदावर राठोड यांची नियुक्ती करण्यात आली असून, इतरही दहा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community