शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे अत्यंत निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून (ED) खिचडी घोटाळा प्रकरणी अटक (arrest) झाली हा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष इशारा असल्याचे बोलले जात आहे. तसेच चव्हाण यांच्या अटकेने आदित्य यांचे पंख कापले गेले असल्याची चर्चा होत आहे. (Suraj Chavan)
चव्हाण हेच अधिकाऱ्यांच्या बैठका घेत
चव्हाण (Suraj Chavan) यांचा कोरोना काळात महापालिकेतील अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क होता आणि आदित्य मंत्री असल्याने त्यांच्यावतीने चव्हाण हेच अधिकाऱ्यांच्या बैठका घेत, सूचना करत असत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच चव्हाण यांचा शब्द म्हणजे आदित्य यांचा शब्द असा प्रघात पक्षात होता. (Suraj Chavan)
(हेही वाचा – Udaynidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन आता राम मंदिरावर बरळले; म्हणाले, ”मशीद पाडून मंदिर बांधणे अमान्य…” )
सर्व ‘अर्थाने’ आदित्य यांचा उजवा हात
४२-वर्षीय, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजिनिअर असलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) , जानेवारी २०१८ पासून पक्षाचे सचिव म्हणून काम पहात आहेत. आदित्य यांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असणारे चव्हाण हेच, आदित्य कुणाला भेटणार, कोणत्या राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावणार, गल्लीपासून दिल्लीपर्यंत दौऱ्याचे, रॅली, रोड शो, यात्रा, विविध उपक्रम यांचे नियोजन अशा सर्व ‘अर्थाने’ आदित्य यांचा उजवा हाथ म्हणून काम पहातात, त्यामुळे त्यांच्या अटकेचा सर्वाधिक फटका आदित्य यांना बसणार असल्याची चर्चा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसते. (Suraj Chavan)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=6ckvX4uydyE
Join Our WhatsApp Community