विकासकामांवरील स्थगितीच्या मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधानसभेचे कामकाज १० मिनिटे स्थगित करण्यात आले. राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का, असा सवाल करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.
(हेही वाचा – मुंबई पालिकेतील औषध खरेदीची चौकशी करणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा)
अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील विकास कामांना स्थगिती दिल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला. त्यानंतर सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरत जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचं करायच काय खाली डोकं वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत दुसऱ्या दिवशीही सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Join Our WhatsApp Community