Nashik चे पालकमंत्रीपद शिवसेना किंवा राष्ट्रवादीला नाहीच!

36
Nashik चे पालकमंत्रीपद शिवसेना किंवा राष्ट्रवादीला नाहीच!
  • खास प्रतिनिधी 

भाजपाने पक्षाचे पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्री नेमले असून त्यात नाशिकला वगळले आहे. त्यामुळे भाजपा नाशिकचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला किंवा शिवसेनेला (शिंदे) देण्यास अनुकूल नाही, हे स्पष्ट झाले.

परदेशातूनच स्थगिती

नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांची नियुक्ती केली होती. त्यावर वर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे तसेच शिवसेनेचे दादा भुसे यांनी विरोध करत दावा केला असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री त्यावेळी दावोस दौऱ्यावर होते आणि वाद वाढू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि रायगड या दोन वादग्रस्त पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला परदेशातूनच स्थगिती दिली.

(हेही वाचा – Mumbai मधील विकासकामांना गती मिळणार; सहा पुलांची कामे तीन महिन्यांत मार्गी लागणार)

१७ संपर्कमंत्री

या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप मिटला नाही आणि भाजपाने १७ संपर्कमंत्री नेमल्याची घोषणा केली. ज्या जिल्ह्यात भाजपाचा पालकमंत्री नाही, अशा जिल्ह्यात भाजपाने पक्ष पातळीवर संपर्कमंत्री नेमून संबंधित जिल्ह्यात पक्षवाढीचा प्रयत्न केला आहे. त्यात रायगड जिल्ह्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे मात्र नाशिकच्या संपर्कमंत्र्याचा उल्लेख नाही. त्यामुळे नाशिकचे (Nashik) पालकमंत्रीपद भाजपा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसाठी सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाजन जळगावचे संपर्कमंत्री

जळगावचे संपर्कमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती भाजपाकडून करण्यात आली आहे. नाशिकबाबत (Nashik) फडणवीस ठाम असून गिरीश महाजन यांच्यावरच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी शक्यता अधिक आहे. महाजन यांना नाशिक २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभ मेळासाठी सोई-सुविधा आणि व्यवस्था करण्याचा अनुभव असल्याने २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळासाठी महाजन यांच्या अनुभवाचा उपयोग चांगला होऊ शकतो, यासाठी महाजन यांच्यावरच पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.