भाजपा नवाब मलिकांना म्हणते, ‘चल हट, हवा येऊ द्या!’

76

कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला प्रशस्तिपत्रक देण्याचा अधिकार आपल्याला नाही. तरी देखील एखाद्या यंत्रणेने जमवलेले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल, तर तो गुन्हा आहे, भाजपची सगळी हयात ही संघर्षात गेली आहे. त्यामुळे अधिवेशनात भाजपाची पोलखोल करण्याची धमकी देणाऱ्यांचे वक्तव्य हे हास्यास्पद आणि बालिशपणाचे आहे. नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, ते जर म्हणतात ‘पिक्चर अभी बाकी है…’ तर आम्ही त्यांना मराठीत उत्तर देतो की, ‘चल हट, हवा येऊ द्या!’, अशा प्रकारे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मलिकांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले.

एनसीपीच्या नेत्यांना हिवाळी अधिवेशनात हुडहुडी भरेल

क्रांती रेडकर ही आमची मराठी भगिनी जर तिची व्यथा मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडत असेल, तर अन्य लोकांच्या पोटात का दुखते? तो क्रांती रेडकर यांचा अधिकार आहे. पण जग पाहत आहे कि, एका मराठी बहिणेला सत्तेत बसलेले लोक कसे अपमानित करत आहेत, तिची बदनामी करत आहेत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भाजपाला अडचणीत आणण्याची भाषा करणारे मलिक आणि एनसीपीच्या नेत्यांनी आधी त्यांचा विचार करावा, हिवाळी अधिवेशनात त्यांच्या किती नेत्यांना थंडी वाजून हुडहुडी भरणार आहे, याचा त्यांनी विचार करावा, असेही शेलार म्हणाले. मलिक म्हणाले की, मी भंगारवाला आहे, आता भाजपच्या सगळ्या लोकांचे नट बोल्ट काढून वितळवून टाकणार आहे. त्यांचे हे विधान बालिशपणाचे आहे. असे असेल तर मोहित कंभोज यांनी मलिक यांना आव्हान दिले होते की, त्यांची स्वतःची वैद्यकीय चाचणी करण्यात याची त्यात अमली पदार्थ सेवन करत असल्याचे काहीच आढळून येणार नाही, तशी चाचणी नवाब मलिक यांनीही करावी. कंभोज यांचे आव्हान आधी मलिक यांनी स्वीकारावे, असेही शेलार म्हणाले.

(हेही वाचा : नियमाचा भंग करून प्रभाग पुनर्रचनेचा प्रस्ताव तयार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.