आनंदराव अडसुळांना  अटकेपासून संरक्षण नाहीच! 

ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही अडसुळ यांनी न्यायालयाला केली.

सिटी को- ऑपरेटिव्ह बँकेत ९८० कोटी घोटाळ्याप्रकरणी माजी खासदार व शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांच्यावर ईडीने मनी लॉन्डरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याविरोधात अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीच्या कारवाईविरोधात अडसुळांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, अडसुळांना अटकेपासून संरक्षण देण्यास तूर्तास नकार दिला, मात्र, अडसुळांने सुधारित याचिका सादर करण्यास सांगत सुनावणी ८ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

(हेही वाचा : भावना गवळींना ‘वर्षा’ वर ‘नो एन्ट्री’?)

अडसूळ काय म्हणाले याचिकेत? 

ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी अडसुळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही अडसुळ यांनी न्यायालयाला केली होती. अडसुळ यांनी याचिकेत म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात मनमानी पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने अवैध ठरवून रद्द केले. त्यामुळे राजकीय सुडापोटी ही कारवाई करण्यात आली आहे, असेही अडसूळ म्हणाले. नुकतेच ईडीने शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनाही समन्स पाठवले आहे. सोमवार, ४ ऑक्टोबर रोजी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणारे आहे. अशा प्रकारे शिवसेनेचे एकामागोमाग एक नेते अडचणीत सापडू लागले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here