प्रेयसीच्या पतीला पळवून लावण्यासाठी त्याने रचला खतरनाक कट!

तक्रारदार याची पत्नी एलआयसी एजंट असल्यामुळे रुपेश पाटील याची पॉलिसी तिने काढली होती, दरम्यान दोघे एकमेंकाच्या संपर्कात आले. रुपेश पाटील याचे ऐश्वर्य बघून तिने रुपेश सोबतचा संपर्क वाढवला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

प्रेयसीच्या पतीला पळवून लावण्यासाठी त्याने एकदा नव्हे, तर चक्क दोन वेळा प्रेयसीच्या पतीवर भाडोत्री गुंडाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात घडली. मात्र दुसऱ्यांदा झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध घेऊन प्रियकराच्या देखील मुसक्या आवळल्या. सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे प्रेयसीचा प्रियकर दिवा सोडून गेल्यावर दोघांना रान मोकळे मिळेल म्हणून घाबरवण्याच्या हेतूने हे दोन्ही हल्ले केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. या हल्ल्यासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची सुपारी गुंडांना देण्यात आली होती, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे सपोनि. शहाजी शेळके यांनी दिली आहे.

ऐश्वर्य पाहून ‘ती’ प्रेमात पडली! 

रुपेश अभिमन्यू पाटील (३१), अंकित मोरेश्वर शिंदे (२१), साजन पाटील (२१), सनी राजभर (२१) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून रुपेश पाटील हा मुख्य सूत्रधार आहे. रुपेश याचा शीळ डायघर येथे हॉटेलचा व्यवसाय असून त्याच परिसरात अनधिकृत बांधकाम करण्याचा व्यवसाय देखील आहे. दिवा येथे राहणारे तक्रारदार हे वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये नोकरीला आहे व त्याची पत्नी ही एलआयसी एजंट असून हे दोघे पती-पत्नी मागील काही वर्षांपासून दिवा येथे राहण्यास आले होते. तक्रारदार याची पत्नी एलआयसी एजंट असल्यामुळे रुपेश पाटील याची पॉलिसी तिने काढली होती, दरम्यान दोघे एकमेंकाच्या संपर्कात आले. रुपेश पाटील याचे ऐश्वर्य बघून तिने रुपेश सोबतचा संपर्क वाढवला आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

(हेही वाचा : राज्यात महिला सुरक्षित? गेल्या काही दिवसांत घडल्या ‘इतक्या’ बलात्काराच्या घटना)

सनी राजभर याला ५० हजारांची सुपारी दिली!

याबाबत तिच्या पतीला कुठलीही कल्पना नव्हती, तो रात्रीच्या वेळी कामावर जात असे आणि दिवसा घरी येऊन झोपत असे, यामुळे त्याला पत्नीच्या या प्रकरणाची माहिती नव्हती. प्रेयसीला पतीपासून विभक्त करण्यासाठी रूपेशने त्याला त्रास देण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने डोंबिवली पूर्व वैभव नगरी येथे राहणारा सनी राजभर याला ५० हजारांची सुपारी दिली. सनीने अंबरनाथ आणि तळोजा परिसरातून दोन गुंडांना सोबत घेऊन गेल्यावर्षी प्रेयसीच्या पतीला रात्रीच्या सुमारास रस्त्यात गाठून त्याच्यावर हल्ला करून त्याला लुटले होते. मुंब्रा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, मात्र लुटमार करणारे अनोळखी इसम होते व लुटीच्या उद्देशातून त्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले होते.

अशी केली अटक! 

आपला संशय आला नाही म्हणून रुपेशने पुन्हा दुसऱ्यांदा गुंडांना ५० हजाराची सुपारी देऊन यावेळी त्याला चांगली अद्दल घडवा, असे भाडोत्री गुंडांना सांगितले होते. १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तक्रादार दिवा आगासन रोड येथून रिक्षाने कामावर जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या गुंडांना रिक्षा अडवून रिक्षा चालक आणि तक्रारदार यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून हवेत एक गोळीबार केला. घाबरलेल्या तक्रारदाराने प्रसंगावधान दाखवून समोरच असलेल्या मानव कल्याण या हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. हल्लेखोरांनी हॉस्पिटलमध्ये जात डॉक्टरला रिव्हॉल्वर दाखवत तक्रादाराचा शोध घेत होते. मात्र या प्रकारामुळे गोंधळ निर्माण झाल्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच व्यक्तीवर दोन वेळा हल्ला होत असल्यामुळे पोलिस देखील गोंधळली होते. मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. शहाजी शेळके, संतोष उगलमुगले, पोउनी. दीपक घुगे, पोलिस अंमलदार मोरे, रहिस जाधव, पाटील घोडके या पथकाने आगासन रोड आणि मानव कल्याण हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासून एका हल्लेखोरांची ओळख पटवून त्याला डोंबिवली येथून ताब्यात घेऊन चौकशीत खरा प्रकार उघडकीस येताच रुपेश पाटील आणि इतर हल्लेखोरांना अटक करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here