- प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election) अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आप आणि काँग्रेसने तर उमेदवार देखील जाहीर केले. मात्र भाजपाने प्रचार करण्यात आघाडी घेतली असल्याचे दिसते. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली विधानसभा निवडणुकीचा भाजपा जोरात प्रचार सुरु करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी दिल्ली निवडणुकीसाठी (Delhi Assembly Election) भाजपाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. या आठवड्यात ते दोन रॅलीत सहभागी होणार आहेत. दुसरा मेळावा 3 जानेवारीला होणार आहे. दुसरीकडे आपने सर्व मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत प्रचारालाही सुरूवात केली आहे. अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या असून मतदारांपर्यंत त्या पोहचवण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसनेही आप आणि भाजपाविरोधात श्वेतपत्रिका जारी करत आपणही लढतीत असल्याचे दाखवून दिले आहे. आप, भाजपा आणि काँग्रेस अशीच तिरंगी लढत राज्यात होणार, हे निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी रिठाळा येथे नवीन मेट्रो मार्गाची पायाभरणी करतील. यासोबतच ते देशातील पहिल्या सेमी-हाय-स्पीड ट्रेन कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही करणार आहेत.
(हेही वाचा – Unani College: रायगड जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार राज्याचे पहिले शासकीय युनानी महाविद्यालय )
या प्रकल्पाला दिल्ली-मेरठ रॅपिड रेल प्रकल्प असेही म्हणतात. यानंतर पीएम मोदी रोहिणीच्या जपानी पार्कमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील. यासाठी पक्षाच्या दिल्ली युनिटने विभागीय अध्यक्षांना किमान दोन बसेस लोकांनी भरून आणण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, 3 जानेवारी रोजी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य दिल्लीतील अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. (Delhi Assembly Election)
यामध्ये दिल्ली ते सहारनपूर या नवीन महामार्गाचाही समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील महिलांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करू शकतात. नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील 29 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली-मेरठ रॅपिड रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करतील. ते साहिबाबाद ते गाझियाबादमधील आनंद विहार स्थानकापर्यंत नमो भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. पहिल्या टप्प्यात नमो भारत ट्रेन साहिबाबाद ते दुहाई आणि दुसऱ्या टप्प्यात नमो भारत ट्रेन दक्षिण मेरठ येथून धावणार आहे. दिल्ली ते मेरठ हा जलद रेल्वे प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. (Delhi Assembly Election)
(हेही वाचा – Jammu – Kashmir मध्ये बर्फवृष्टी; ६८ पर्यटकांची लष्कराने केली सुटका)
वेळापत्रक कधी जाहीर होणार?
दिल्लीतील विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Election) फेब्रुवारीमध्ये होणार असल्याने पुढील काही दिवसांतच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नव्या वर्षाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाईल, असा अंदाज आहे. दिल्लीसह बिहारमध्येही निवडणूक होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community