औरंग्याच्या थडग्याचा उद्धार, पण महाराणी ताराबाईंच्या समाधीची उपेक्षा! छत्रपतींच्या महाराष्ट्रात चाललंय काय?

120
छत्रपती महाराणी ताराबाई यांचे माहुली, सातारा येथील समाधीस्थळ सध्या चर्चेत आले आहे. अख्खी समाधी आज जमिनीत लुप्त झाली असून केवळ वरचा भाग राहिला आहे. अशी दुरवस्था झालेले समाधीस्थळ संतापाचा विषय बनत चालला आहे. याला कारणही आहे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याचे उद्दात्तीकरण.
१७व्या शतकाच्या शेवटी क्रूरकर्म्या औरंगजेबाला ज्या महिलेने झुंजवले त्या छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या समाधीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे आणि दुसरीकडे औरंगजेबाच्या थडग्याची रंगरंगोटी होत आहे, त्याच्यावर एमआयएमचा नेता अकरुद्दीन ओवैसी फुले वाहून महाराष्ट्राला खिजवत आहे. त्यामुळे आता समस्त हिंदूंचे डोळे खाडकन उघडले असून ‘जर पुरातत्व विभाग औरंग्याच्या थडग्याचा उद्धार करत असेल, तर औरंग्याला दख्खनच्याच मातीत गाडणाऱ्या वाघिणीच्या समाधीस्थळाकडे दुर्लक्ष का झाले? आमच्या शक्तीस्थळांची स्मृती आम्हालाच नाही, कारण औरंग्याच्या थडग्यास भव्य स्वरूप दिले जाताना राग येत नाही आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधीची दुरवस्था पाहून लाज वाटत नाही’, असा संदेश सोशल मीडियात फिरत आहे.

औरंगजेबाच्या थडग्याचे उद्दात्तीकरण संतापास कारण 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण का होत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊन अडीच वर्षे झाली, तरी का पूर्ण करू शकले नाहीत, या विचाराने महाराष्ट्राची जनता अस्वस्थ बनली आहे. असे असतानाच एमआयएम पक्षाचे नेते अकरुद्दीन ओवैसी औरंगाबाद येथे आले आणि त्यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या थडग्याला फुले वाहिली आणि डोके टेकवले. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळी आहे. त्याच बरोबर आता हिंदूंवर आक्रमण करणारा औरंगजेब काय किंवा अफझल खान काय, या सगळ्यांच्या थडग्यांचे आजवर राजकीय पातळीवर मुसलमानांच्या लांगुलचालनासाठी उद्दात्तीकरण करण्यात आले आणि हिंदू पराक्रमी राजे, योद्धे यांच्या समाधीस्थळांची मात्र दैन्यवस्था झाली आहे, हे आता प्रकर्षाने जाणवू लागले आहे. त्यामुळे सोशल मीडियातून यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महाराणी ताराबाई यांच्या समाधीस्थळाचा असा करावा लागेल विकास!  

देशभरातील पुरातत्व वास्तू, समाधीस्थळे, गड-किल्ले यांची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाची असते. याठिकाणी पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय येथील एक दगडही हलवता येत नाही, त्यांचे स्थानही बदलता येत नाही. जर नैसर्गिक संकटांमुळे एखाद्या पुरातन वास्तूचे नुकसान झाले, तर त्यांची दुरुस्ती करता येते. महाराणी ताराबाई यांचे समाधीस्थळ तीनशे वर्षांपूर्वीचे आहे. या समाधीस्थळाचे जतन आणि संवर्धन करण्याकडे सरकारी व्यवस्थेने अनास्था दाखवली, त्यामुळे आज ही समाधी जमिनीत लुप्त झाली आहे. आता येथील समाधीचा पुनर्विकास करायचा असेल, तर आधी त्याच्या आजूबाजूला उत्खनन करावे लागेल. त्यावेळी त्याचा पाया मिळेल, तसेच समाधीचे दगड जे बाजूला विखुरले असतील ते सापडतील, त्यावरील नक्षीकाम अभ्यासून त्यानुसार समाधीस्थळाची पुनर्बांधणी करता येते, अशी पुरातत्व विभागाची कार्यपद्धत आहे. कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाचा पुनर्विकास याच प्रकारे करण्यात आला, असे सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला सांगितले.

… म्हणून महाराणी ताराराणी यांच्या समाधीस्थळाची दुरवस्था! 

हे सर्व करण्यासाठी हिंदूंमध्ये इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. ज्या प्रक्रारे राजकारणी औरंग्याच्या थडग्यावर चादर चढवत आहेत, या घटना औरंगजेब अजूनही जिवंत आहे, याची साक्ष मिळते. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावर आक्रमण केले होते, छत्रपती संभाजी राजे यांना हालहाल करून ठार केले होते. अफझल खानाने हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली होती. हिंदूंच्या माता-भगिनींवर अत्याचार केले होते, अशा औरंबागजेब, अफझल खान यांच्या कबरी तयार होणे, ती वंदनीय बनवणे, हा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे. मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी सत्तास्थानी असलेल्यांनी यांचे उद्दात्तीकरण केले. याला कारण हिंदू जागृत नाहीत. कारण पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या मुसलमानांच्या कबरी, थडगी यांची रंगरंगोटी करताना नियम लागत नाही, पण हिंदूंच्या प्रार्थनास्थळांबाबत नियम शिकवले जातात. अफझल खानाच्या कबरीकडील एखादे झाड मेले, तरी मुसलमान हाय हाय करत कांगावा करतात आणि पुरातत्व विभाग लागलीच दुरुस्ती करते, पण महाराणी ताराराणी यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी मात्र पुरातत्व विभागाची अनास्था दिसते, असेही रघुजीराजे आंग्रे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.