गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेल्या राजकारण्यांवर (Politician) आजीवन बंदी घालावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेविरोधात केंद्र सरकारने (Central Govt) शपथपत्र दाखल केले आहे. आयुष्यभराची बंदी घालणे कठोर निर्णय असेल, त्याऐवजी सहा वर्षांची बंदी घालावी, असे केंद्र सरकारने शपथपत्रात म्हटले आहे. (Supreme Court)
हेही वाचा-असल्फा मेट्रो स्थानकाजवळील अनधिकृत इमारत आणि हॉटेल्सवर BMC ची कारवाई
फौजदारी खटल्यांमध्ये दोषी ठरलेल्या नेत्यांवर आजीवन बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकाला विरोध करताना केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आपली बाजू मांडली. या याचिकेत दोषी खासदार-आमदार आणि इतर नेत्यांवर निवडणूक लढवण्यास आजीवन बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सरकारला या मागणीवर उत्तर देण्यास सांगितले होते. (Supreme Court)
वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी २०१६ मध्ये दोषी आमदार किंवा खासदारांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. २०१६ पासून प्रलंबित असलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम आठला आव्हान देण्यात आले होते. यानुसार दोषी राजकारण्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर फक्त सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मर्यादा आहे. (Supreme Court)
हेही वाचा-महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन होणार; परिवहन मंत्री Pratap Sarnaik
सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटलं की, “याचिकेत केलेली विनंती म्हणजे कायद्याचे पुनर्लेखन करणे किंवा संसदेला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देणे आहे. जे सुप्रीम कोर्टाच्या न्यायिक पुनरावलोकनाच्या अधिकारांच्या पलीकडे आहे. अशाप्रकारे अपात्रतेचा निर्णय घेणे केवळ संसदेच्या अधिकारक्षेत्रात येते. आजीवन बंदी घालणे योग्य आहे का हा प्रश्न पूर्णपणे संसदेच्या अधिकारक्षेत्रात आहे. दंडाची अंमलबजावणी योग्य वेळेपर्यंत मर्यादित करून अनावश्यक कठोर कारवाई टाळली गेली पाहिजे.” (Supreme Court)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community