राज्यभरात बुधवारी २० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान संपन्न झाले. निकाल काही अवघ्या तासांवर आलेला असताना त्याचबरोबर निवडणूक चुरशीची झालेली असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. नेहमीप्रमाणे सकाळच्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी काँग्रेसला एक प्रकारे इशारा देत राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातच ठरवला जाईल दिल्लीत नाही असे वक्तव्य केले आहे. (Sanjay Raut)
(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024: मराठवाड्यात लाडक्या बहिणींनी वाढवला मतदानाचा टक्का!)
विधानसभेचे मतदान संपन्न झाल्यानंतर राज्यभरात विविध संस्थांकडून तसेच माध्यमांकडून करण्यात आलेल्या एक्झिट पोलचे अंदाज पाहिल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्या प्रमाणे सकाळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उत्तम कारभार करू शकतात असे जरी म्हटले असते तरी दुसरीकडे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला आहे. (Sanjay Raut)
नाना पटोले बैठकीपासून दूर
काँग्रेसचे राज्याचे प्रमुख नाना पटोले असले तरी काल महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठीत ते उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ग्रँड हयात येथे झालेल्या बैठकीत उपस्थित होते. विधानसभेच्या जागा वाटपाच्या बैठकीत संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता त्यातच संजय राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर बरेच काही सांगून जातो.यावरून शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरील दावा देखील काहीसा धूसर झाल्याचे दिसून येतो. (Sanjay Raut)
संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार
उद्या येणाऱ्या निकालाच्या आधी महाविकास आघाडीमध्ये बैठकांचा जोर वाढला असून आज देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका होणार आहे.त्याआधी संजय राऊत शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत. संजय राऊत यांच्या बदललेल्या सुरामुळे तसेच आजच्या भेटीमुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे सूर जुळताना दिसत आहेत. यामुळेच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस विरोधात भूमिका घेतली जात आहे का ? याचा संशय देखील बळावला आहे. (Sanjay Raut)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community