कर्नाटक सरकारने राज्यातील हिंदू मंदिरांवरील (Hindu Temple) मिळकतीवर कर लावण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर करून घेतले होते. मात्र विधान परिषदेत बहुमताच्या अभावाने हे विधेयक नामंजूर झाले होते.मात्र हिंदू द्वेषी कॉँग्रेस सरकारने यासाठी वेगळा कट रचला आहे.
(हेही वाचा Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडे गुरुजींच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न)
कर्नाटकातील ‘हिंदु धार्मिक संस्था आणि चॅरिटेबल एंडोमेंट्स (सुधारणा) विधेयक, २०२४’ विधानसभेत मांडून पुन्हा संमत करण्यात आले. यापूर्वीही ते विधानसभेत संमत करण्यात आले होते. त्यानंतर ते गेल्या आठवड्यात विधान परिषदेत फेटाळून फेरविचारासाठी विधानसभेकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता ते पुन्हा विधनासभेत संमत करण्यात आले. आता हे विधेयक थेट राज्यपालांकडे त्यांच्या संमतीसाठी पाठवले जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचा कायदा बनेल. या विधेयकानुसार ५ लाख ते १० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या मंदिरांना (Hindu Temple) त्यांच्या निव्वळ उत्पन्नाच्या ५ टक्के कर लावण्यात येणार आहे, तर ज्या मंदिरांचे वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना १० टक्के वाटा द्यावा लागेल.
(हेही वाचा MLC : विधान परिषदेचे १० आमदार निवृत्त होणार; शुक्रवारी दिला जाणार निरोप)
Join Our WhatsApp Community