संविधान ही एका पक्षाची देणगी नाही; Rajnath Singh यांनी काँग्रेसला सुनावले खडेबोल

118
संविधान ही एका पक्षाची देणगी नाही; Rajnath Singh यांनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
  • प्रतिनिधी 

संविधान ही एका पक्षाची देणगी नसल्याचे काँग्रेसला सुनावताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी संसदेत बोलताना संविधान निर्मिती प्रकिया स्पष्ट केली. शुक्रवारी संसदेत संविधान विषयावर चर्चा झाली. लोकसभेत संविधानावरील चर्चेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरुवात केली. तसेच काँग्रेस पक्षाने आतापर्यंत संविधानाच्या नावाखाली केवळ लोकांची फसवणूक केली, असे सांगताना ते म्हणाले की काही लोक आपल्या संविधानाला वसाहतवादाची देणगी किंवा चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे.

संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली. आपली राज्यघटना लिहिण्याच्या सहा वर्षे आधी म्हणजे 1934 मध्ये अनेक बड्या नेत्यांनी ‘हिंदुस्थान मुक्त राज्याच्या संविधाना’ मध्ये राज्यघटनेबद्दल आपली मते मांडली होती. राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले की, काही लोक आपल्या संविधानाला वसाहतवादाची देणगी किंवा चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली.

(हेही वाचा – Kurla Best Bus Accident : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तानंतर तात्काळ कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा सुरू)

लोकसभेत संविधानावरील चर्चेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की, 75 वर्षांपूर्वी संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे काम पूर्ण केले होते. संविधान सभेने तयार केलेली राज्यघटना केवळ कायदेशीर दस्तऐवज नसून ती लोकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, राज्यघटनेने देशात खऱ्या अर्थाने लोकशाही लागू केली. आपली राज्यघटना सार्वत्रिक आहे, त्यात राज्याच्या जबाबदाऱ्यांची यादी तर आहेच, शिवाय त्यात नागरिकांच्या हक्कांचाही उल्लेख आहे.

आपली राज्यघटना सहकारी लोकशाहीची खात्री देते आणि राष्ट्राची एकात्मताही सुनिश्चित करते. भारतीय राज्यघटनेचा उद्देश देशाचा अभिमान प्रस्थापित करणे हे आहे. राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले की, काही लोक आपल्या संविधानाला वसाहतवादाची देणगी किंवा चांगल्या गोष्टींचा संग्रह मानतात. गेल्या काही वर्षांपासून संविधान ही एकाच पक्षाची देणगी आहे, असे वातावरण देशात निर्माण झाले आहे. संविधान निर्मितीत अनेकांची भूमिका नाकारली गेली. आपली राज्यघटना लिहिण्याच्या सहा वर्षे आधी म्हणजे १९३४ मध्ये अनेक बड्या नेत्यांनी ‘हिंदुस्थान मुक्त राज्याच्या संविधाना’ मध्ये राज्यघटनेबद्दल आपली मते मांडली होती.

(हेही वाचा – Veer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’द्वारे अनुभवा वीर सावरकरांचा जीवनपट)

संविधान निर्मितीचे काम हायजॅक करण्याचा प्रयत्न

संविधान निर्मितीचे काम हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला, असल्याचे सांगताना काँग्रेसवर निशाणा साधत राजनाथ सिंह म्हणाले की, ‘संविधान निर्मितीचे प्रक्रियेतील अनेक गोष्टी गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. तसा प्रयत्न एका विशिष्ट पक्षाकडून नेहमीच होत आला आहे. संविधान निर्मितीशी संबंधित गोष्टी संविधानात नेहमीच दडलेल्या होत्या. आपली राज्यघटना ही कोणा एका पक्षाची देणगी नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.