‘अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली’

पंतप्रधान मोदींनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा करत शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत असल्याचेही ते म्हणाले. कृषी कायद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते, याचे उदाहरण आहे. तसेच अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली आहे, असेही ते म्हणाले.

त्यांना माझं त्रिवार वंदन

देशभरात शेतकरी कृषी कायद्यांविरुद्ध विरोधाचं वातावरण होते. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. या आंदोलनात जे वीर प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा – …तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार)

कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रिया लवकर होईल

गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली, ही सरकारला झालेली उपरती आहे. या कृषी कायद्यांविरुद्ध महाविकास आघाडीने आपली भूमिका असल्याचे वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. तसेच हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल, अशी माझी अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here