कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या यापूर्वी पाच दिवसांनंतर करण्यात येत असल्या तरी यापुढे या प्रोटोकॉलमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे बाधित रुग्णांच्या संपर्कातील सर्वच लोकांच्या कोविड चाचण्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे. ज्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने घेतलेल्या या मोहिमेमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांकडून होणारा संसर्ग रोखता येणार आहे. यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांकडून होणारा संसर्ग रोखता येणार आहे.
बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्वरीत चाचण्या केल्या जाणार
मुंबईतील दुसरी लाट ओसरल्यानंतर जनजीवन काही प्रमाणात सुरळीत होत असतानाच तिसऱ्या लाटेची भीती वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज असून यासाठी कोविड सेंटरसह ऑक्सिजन खाटा आणि इतर सर्व यंत्रणा सज्ज आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट करताना कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या चाचणीकरता जुन्या पध्दतीचा वापर करण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी कोविड बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या पाच दिवसांनंतर चाचणी केल्या जायच्या. परंतु आता या चाचण्या बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्वरीत केल्या जाणार आहे. तसेच पाच दिवसांनंतरही पुन्हा संबंधित संशयित रुग्णांच्या कोविड चाचण्या करण्यात येणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा : धक्कादायक! राज्यात तिसरी लाट आली, सुरुवात नागपुरातून!)
पहिल्याच दिवशी चाचणी करण्याचा निर्णय
पूर्वी पाच दिवसांनंतर चाचण्या करण्यात येत असल्याने त्या व्यक्ती बाहेर फिरल्यास त्यांच्यापासून संसर्ग होण्याची भीती होती. त्या संसर्गाचे प्रमाणे बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांच्या पहिल्याच दिवशी चाचणी केल्यामुळे टाळता येईल. शिवाय त्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल जर पॉझिटिव्ह आढळून आला, तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार योग्यप्रकारे करता येवू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी पहिल्याच दिवशी करण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी आपण बाधित रुग्णांच्या संख्येवर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community